maharashtra police act 1951 pdf in marathi महाराष्ट्र पोलीस कायदा माहिती, आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र पोलीस अॅक्ट काय आहे आणि हा कायदा महाराष्ट्रातील पोलिसांना कसा मदत करतो या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. पोलीस हे कोणाला माहित नाहीत जे अनेक सामाजिक सेवेसाठी दिवस रात्र हजर असतात. नागरिकांची किंवा लोकांची सेवा करण्यासाठी तसेच कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि तसेच परिसरामध्ये होण्याऱ्या गुन्हेगारीला आळा घालणे या सारखी अनेक प्रकारची कामे करतात आणि म्हणून पोलीस यंत्रणेला देखील कायद्याच्या चौकटी मध्ये ठेवण्यासाठी किंवा नियम घालून देण्यासाठी हा कायदा ब्रिटीश राजवटी मध्ये म्हणजेच १८६१ मध्ये लागू झाला होता.
हा कायदा नंतर महाराष्ट्रामध्ये ब्रिटीश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१ मध्ये लागू करण्यात आला. या कायद्याला असे म्हंटले जाते कि महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलाच्या किंवा पोलीस यंत्रणेच्या नियमनासाठी कायद्याचे एकत्रीकरण आणि त्यामध्ये आवश्यक असल्यास सुधारणा करणारा कायदा म्हणून महाराष्ट्र पोलीस कायद्याला ओळखले जाते.
महाराष्ट्र पोलीस कायदा हा संपूर्ण महराष्ट्रामध्ये विस्तारलेला आहे आणि या महाराष्ट्र पोलीस या विभागाचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे म्हणून याचे कामकाज हे हे त्या ठिकाणाहून चालू होते. या कायद्यामध्ये अश्या तरतुदी आहेत ज्या हिंसाचाराला सूचित करत नाहीत आणि त्यांचा उपयोग हा शांततापूर्ण अभिव्यक्ती आणि संमेलनास प्रतिबंध करण्यासाठी केला जाऊ शकतो.